बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    नियोजन विभागाचे प्रामुख्याने कार्यक्रम प्रभाग व रोजगार हमी योजना प्रभाग असे दोन प्रभाग आहेत. कार्यक्रम प्रभागात प्रामुख्याने कार्यक्रमांतर्गत बाबींचा समन्वय साधला जातो व त्याकरीता कार्यक्रमांतर्गत अपेक्षित व्यय निश्चित करून त्यानुसार निधीचे वाटप करणे या बाबी हाताळल्या जातात.

    अपर मुख्य सचिवव विकास आयुक्त हे या विभागाचे प्रमुख असून कार्यक्रम प्रभागाशिवाय विभागाच्या आस्थापनाविषयक बाबी त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत.
    नियोजन विभाग या दोन्ही प्रभागांच्या मंत्रालयीन स्तरावरील आस्थापना विषयक बाबी व अर्थसंकल्पीय बाबी कार्यक्रम प्रभाग हाताळतो. विभागाच्या नियंत्रणाखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनाविषयक बाबीदेखील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग म्हणून या विभागाकडून हाताळल्या जातात.

    नियोजन विभागाच्या कार्यकक्षेत राज्य नियोजन मंडळ असून सदर मंडळावर कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येते व त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. या राज्य नियोजन मंडळाच्या आस्थापनाविषयक बाबी नियोजन विभागातर्फे हाताळल्या जातात.

    विभागाची एकत्रित कामे पार पाडण्यासाठी अपर मुख्य सचिव(नियोजन) व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव ( रो.ह.यो.) यांना 11 सह/उप सचिव, 13 अवर सचिव, 1 विशेष कार्य अधिकारी ( पत व पध्दती) व अन्य 46 अधिका-यांचे साहाय्य लाभले आहे. नियोजन विभागामधील विकास क्षेत्राची कामे, रोजगार हमी योजना आणि आस्थापनाविषयक बाबीसंबंधीची कामे पाहण्यासाठी एकूण 44 कार्यासने कार्यशील आहेत.