परिचय
वार्षिक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केलेल्या वेगवेगळया योजनाच्या अंमलबजावणीवर जास्त चांगले आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दि. १ सप्टेंबर, १९७२ पासून नियोजन विभाग निर्माण करण्यात आला आहे. मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) हे नियोजन विभागाचे प्रभारी मंत्री असून त्यांचे अधिपत्याखाली मा. प्रधान सचिव व विकास आयुक्त आणि सचिव (रोजगार हमी) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. नियोजन(खुद्द) विभागाकडील सर्व विषयांची एकूण ४४ कार्यसनांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
या विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे, नियोजन आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य आणि जिल्हा पातळीवर वार्षिक कार्यक्रम तयार करणे हे आहे. केंद्र शासनाने दिनांक १ जानेवारी, २०१५ पासून योजना आयोगाऐवजी नीती आयोगाची स्थापना केली आहे. त्याशिवाय हा विभाग संस्थात्मक अर्थसहाय्य देणाऱ्या अभिकरणांमध्ये संपर्क साधून विकास योजनांसाठी अधिक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करतो.
नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील विशिष्ट व अतिरिक्त कार्यक्रमांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
विभागाचे विशिष्ट कार्यक्रम-
- *राज्याचा वार्षिक कार्यक्रम
- कार्यक्रमांतर्गत योजनांचे समवर्ती मूल्यमापन
- केंद्रसहाय्यित योजना
- राज्य नियोजन मंडळ
- 20 कलमी कार्यक्रम, 2006 चे नियंत्रण
- जिल्हा योजना
- अर्थ व सांख्यिकी संचालनालय
- महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र
- विकास मंडळे
- डोंगरी विभागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम
- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
- शाश्वत विकास ध्येय
- व्हिजन, २०४७.
विभागाचे अतिरिक्त कार्यक्रम:
- तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
- मानव विकास कार्यक्रम
- खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम
- आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम
- नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती दल
- राज्यस्तरीय बँकर्स समिती
- प्रादेशिक ग्रामीण बँकांना भाग भांडवल
- केंद्र व राज्य शासनाच्या बँकिंगशी निगडीत योजनाचा प्रचार, प्रसिध्दी व समन्वय
- शासनाद्वारे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)प्रक्रिया
- आकांक्षित जिल्हा कार्यक्रम
- रोजगार हमी योजना प्रभाग
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र
- वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
- परशुराम आर्थिक विकास महामंडळ
- श्री.वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
- महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण संस्था (अमृत), मुंबई
अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे नियोजन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून त्याचे कार्यक्रम अंदाजपत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येते.